ब्लॉकचेनची मूलतत्त्वे
प्रस्तावना
ब्लॉकचेन तंत्रज्ञान हा डेटा साठवण्याचा आणि त्याचा माग ठेवण्याचा एक क्रांतिकारक मार्ग आहे, आणि तो डेटा कोणालाही पाहता येतो. आजवर झालेल्या सर्व व्यवहारांची एकच सार्वजनिक यादी करून डेटा मांडला जातो. ही यादी कोणीही पाहू शकतो, पण कोणीही बदलू शकत नाही. व्यवहारांच्या या सार्वजनिक यादीला मिळून ब्लॉकचेन खतावणी म्हणतात.
ब्लॉकचेनचे थर पाहिल्यावर ब्लॉक एक्सप्लोरर नावाचे साधन कोणती रचना दाखवते ते समजेल: ब्लॉकची यादी, त्या ब्लॉकमधले व्यवहार, आणि प्रत्येक व्यवहाराचे तपशील. हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी Ethereum-चा लोकप्रिय ब्लॉक एक्सप्लोरर Etherscan उघडून पाहा.
ब्लॉकचेनची रचना
ब्लॉकचेन हा शब्द नाम म्हणून (Bitcoin ब्लॉकचेन) किंवा विशेषण म्हणून (ब्लॉकचेन तंत्रज्ञान) वापरता येतो. दोन्ही अर्थांनी ब्लॉकचेन म्हणजे ज्या रचनेवर क्रिप्टोकरन्सी उभ्या आहेत ती संपूर्ण रचना.
बाहेरून आत पाहिले तर ब्लॉकचेनच्या रचनेत 3 स्तर दिसतात:
- संपूर्ण
ब्लॉकचेनक्रमाने जोडलेल्या ब्लॉकपासून बनते ब्लॉकम्हणजे एकत्र केलेल्या व्यवहारांचे गटव्यवहारम्हणजे नेटवर्कवरील पत्त्यांदरम्यान झालेली मूल्याची देवाणघेवाण, किंवा प्रोग्रामना दिलेल्या सूचना
हे तीन स्तर मिळून एक क्रिप्टोग्राफिक खतावणी तयार होते: नेटवर्कवर झालेल्या सर्व व्यवहारांचा कधीही न बदलणारा इतिहास.
ज्ञान तपासणी 1
ब्लॉकचेन म्हणजे काय?
-
[ ] व्यवहारांचे संघटित गट, ज्यांना ब्लॉक म्हणतात
-
[ ] कोणालाही पाहता येणारी पण कोणालाही बदलता न येणारी सामायिक नोंद
-
[ ] क्रमाने एकमेकांना जोडलेले ब्लॉक
-
[ ] वरील सर्व
खतावणी तपासून पाहणे
पैशाच्या नेहमीच्या व्यवस्थेत कोणाकडे किती पैसे आहेत याचा हिशोब बँकांसारखे तिसरे पक्ष ठेवतात, आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पण खऱ्या अर्थाने Bankless होण्यासाठी अशी व्यवस्था हवी, जिथे खतावणी सांभाळण्यासाठी एकाच संस्थेवर विश्वास ठेवावा लागणार नाही.
खतावणी म्हणजे ब्लॉकचेनवर आजवर झालेल्या सर्व व्यवहारांची यादी, आणि सार्वजनिक ब्लॉकचेनवर ती कोणीही पाहू शकतो. खतावणीतील व्यवहारांचे वेगवेगळे गट म्हणजे ब्लॉक, आणि तेच मिळून ब्लॉकचेन तयार होते.
खतावणीत नवे व्यवहार जोडले की प्रत्येक पत्त्यावरची शिल्लक अद्ययावत होते; जुने व्यवहार बदलता येत नाहीत. हे म्हणजे प्रत्येकाच्या बँक खात्याचा संपूर्ण व्यवहार-इतिहास कोणालाही, कधीही पाहता येण्यासारखे आहे.
खतावणीतील व्यवहार
काही उदाहरणे पाहा:
- Alice, Bob-ला 5 ETH पाठवते
- Bob, Charlie-ला 2 ETH पाठवतो
प्रत्येक व्यवहार त्या पत्त्यावरील क्रिप्टोकरन्सीमधला बदल दाखवतो, त्यामुळे सर्व व्यवहारांची एकत्रित बेरीज म्हणजेच प्रत्येक पत्त्याकडे असलेली क्रिप्टोकरन्सी.
⇒ Alice-चे 5 ETH कमी झाले
⇒ Bob-चे एकूण 3 ETH वाढले (5 मिळाले, 2 पाठवले)
⇒ Charlie-चे 2 ETH वाढले
ज्ञान तपासणी 2
सार्वजनिक ब्लॉकचेन खतावणीबद्दल खालीलपैकी काय खरे आहे?
-
[ ] सर्व व्यवहार सार्वजनिक असतात आणि जुने व्यवहार बदलता येत नाहीत
-
[ ] प्रत्येक पत्त्याकडे सध्या किती क्रिप्टोकरन्सी आहे हे खतावणी दाखवते
-
[ ] नवे व्यवहार जोडले जातात तसतशी खतावणी वाढत जाते
-
[ ] वरील सर्व
विकेंद्रीकरण
ब्लॉकचेन खतावणीतील व्यवहार बदलता येत नाहीतच, शिवाय ते संगणकांच्या मोठ्या नेटवर्कमध्ये सामायिक आणि वाटलेले असतात. डेटा बदलण्याची ताकद एकाच संस्थेकडे राहू नये म्हणून ब्लॉकचेन खतावणीच्या प्रती नेटवर्कवरील अनेक संगणकांवर ठेवल्या जातात. या संगणकांना नोड म्हणतात.
हा सामायिक डेटा हीच गोष्ट ब्लॉकचेन खतावणीला विकेंद्रित बनवते. डेटावर कोणत्याही एका सत्तेचे किंवा संस्थेचे नियंत्रण नसते. Ethereum-सारख्या ब्लॉकचेन सार्वजनिक देखील आहेत, कारण खतावणी कोणालाही पाहता येते.
या धड्यापुरते एवढेच लक्षात ठेवा: खतावणीचा डेटा Ethereum नेटवर्क चालवणाऱ्या अनेक संगणकांमध्ये सामायिक असतो.
ज्ञान तपासणी 3
ब्लॉकचेन विकेंद्रित कशामुळे होते?
-
[ ] ब्लॉकचेनवर फक्त एकच संस्था लिहू शकते
-
[ ] सरकारने ठरवलेल्या विकेंद्रीकरणाच्या अटी ती पूर्ण करते
-
[ ] अनेक संगणकांवर साठवलेल्या खतावणीवर कोणाचेही एकहाती नियंत्रण नसते
-
[ ] खतावणी एकाच सुरक्षित सर्व्हरवर साठवलेली असते
ब्लॉकची अंतर्रचना
ब्लॉकचेनचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यवहाराचा डेटा एकदा ब्लॉकमध्ये आला की तो नंतर बदलता येत नाही. याचे कारण असे की प्रत्येक ब्लॉकला बोटाच्या ठशासारखा एक वेगळा ब्लॉक हॅश असतो, आणि त्यानेच ब्लॉक एकापाठोपाठ एक जोडले जातात. तो ठसा बदलल्याशिवाय जुने व्यवहार बदलता येत नाहीत, आणि प्रत्येक ठसा आधीच्या ठशावर अवलंबून असल्याने त्यानंतरच्या प्रत्येक ब्लॉकचा ठसाही बदलावा लागतो.
म्हणजेच प्रत्येक ब्लॉक हा व्यवहारांचा एक गट असतो, आणि त्या ब्लॉकच्या मजकुरातून काढलेला एक वेगळा ठसा (त्याचा ब्लॉक हॅश). प्रत्येक ब्लॉक आधीच्या ब्लॉकच्या ठशाचा संदर्भ देतो, म्हणून ते एकमेकांना जोडले जाऊन एकच ब्लॉकचेन तयार होते.
ज्ञान तपासणी 4
ब्लॉक हॅशचा उद्देश काय आहे?
-
[ ] ब्लॉकचा डेटा एन्क्रिप्ट करून कोणालाही वाचता येऊ नये असा ठेवणे
-
[ ] ब्लॉक एकमेकांना जोडणे आणि जुना व्यवहार डेटा बदलू न देणे
-
[ ] व्यवहार बरोबर पत्त्यावर पोहोचतील याची खात्री करणे
-
[ ] ब्लॉकचेन विकेंद्रित राहील याची खात्री करणे
ब्लॉकच्या आत
लक्षात ठेवा, ब्लॉक डेटा म्हणजे फक्त एकत्र केलेल्या व्यवहारांचा गट. एका ब्लॉकच्या आत पाहिले तर व्यवहारांची यादी दिसते आणि तो ब्लॉक कोणी तयार केला याची थोडी माहिती दिसते.
आधी खतावणीबद्दल बोलताना घेतलेल्या उदाहरणातले दोन्ही व्यवहार एकाच ब्लॉकमध्ये असू शकतात, किंवा कालांतराने वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये विभागले जाऊ शकतात. पण ते कोणत्याही ब्लॉकमध्ये असले तरी शेवटी संपूर्ण ब्लॉकचेन खतावणीत जोडले जातातच.
- Alice, Bob-ला 5 ETH पाठवते
- Bob, Charlie-ला 2 ETH पाठवतो
आठवा की ब्लॉकचेन जोडलेली राहावी म्हणून प्रत्येक ब्लॉकने आधीच्या ब्लॉकच्या ब्लॉक हॅशचा संदर्भ द्यायलाच हवा.
ज्ञान तपासणी 5
ब्लॉकमध्ये कोणती माहिती असते?
-
[ ] आधीच्या सर्व ब्लॉकमधली सगळी माहिती
-
[ ] ब्लॉकच्या आकाराला मर्यादा नसल्याने ब्लॉकचेनशी संबंधित काहीही
-
[ ] व्यवहारांचा डेटा आणि आधीच्या ब्लॉकचा संदर्भ
-
[ ] ठराविक कालावधीत तयार झालेला सर्व व्यवहार डेटा
स्वतंत्र व्यवहार
कोणत्याही ब्लॉकचेनवरचा डेटा म्हणजे फक्त व्यवहार: वापरकर्त्यांमध्ये फिरलेल्या पैशाच्या नोंदी. प्रत्येक व्यवहारावर पाठवणाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी असल्याशिवाय तो वैध ठरत नाही.
वॉलेटमध्ये एखाद्या व्यवहाराला मंजुरी देताना तुम्ही नेमके हेच करता: तुमच्या डिजिटल स्वाक्षरीने त्या व्यवहाराला परवानगी देता. चेक, पावती किंवा क्रेडिट कार्डच्या स्लिपवर प्रत्यक्ष सही करण्याचे हे डिजिटल रूप आहे.
व्यवहार साधे असू शकतात, जसे क्रिप्टो ॲसेट पाठवणे. ते अधिक गुंतागुंतीचेही असू शकतात, जसे क्रिप्टो ॲसेट स्वॅप करणे किंवा गरज पडेल तेव्हा आपोआप चालणारा खास कोड तैनात करणे. या कोडला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणतात.
शेवटी, प्रत्येक व्यवहाराला एक वेगळी डिजिटल ओळख असते, तिला व्यवहार हॅश म्हणतात. दुसऱ्या कोणत्याही व्यवहाराला तीच ओळख नसते. त्यामुळे नंतर कोणत्याही एका व्यवहाराचा उल्लेख करणे सोपे होते आणि त्याचे तपशील नंतर बदलता येत नाहीत.
ज्ञान तपासणी 6
ब्लॉकचेनवरचा डेटा म्हणजे ब्लॉकमध्ये गटबद्ध केलेल्या व्यवहारांची यादी. अशा व्यवहारांची उदाहरणे:
-
[ ] क्रिप्टो ॲसेट पाठवणे किंवा स्वीकारणे
-
[ ] ब्लॉकचा आकार बदलणे
-
[ ] ब्लॉकचेनवरचा जुना डेटा बदलणे
-
[ ] वरील सर्व
वापरकर्त्यांचे पत्ते
पत्ता ही एक सार्वजनिक ओळख असते, जी कोणीही ब्लॉकचेनवर शोधू शकतो. ईमेल पत्त्यासारखेच, कोणीही त्यावर पैसे पाठवू शकतो, पण त्या पत्त्यावरचे पैसे फक्त खाजगी की सांभाळणाऱ्या व्यक्तीलाच वापरता येतात.
Ethereum-वर पत्ता नेहमी _0x__________ असा सुरू होतो आणि तो आकडे व अक्षरे मिळून 42 चिन्हांचा असतो. तो त्या पत्त्याच्या सार्वजनिक कीवरून तयार केलेला असतो.
ब्लॉक एक्सप्लोररमध्ये एखादा व्यवहार पाहताना From: आणि To: हे पत्ते दिसतात. ते पत्ते कोणत्या माणसांच्या ताब्यात आहेत हे यातून कळत नाही, पण ब्लॉकचेन खतावणीत क्रिप्टोकरन्सी कशी फिरते याचा माग कोणालाही घेता येतो.
ज्ञान तपासणी 7
ब्लॉकचेन पत्त्यांबद्दल काय खरे आहे?
-
[ ] ते ब्लॉकचेनवरील वेगवेगळ्या घटकांची सार्वजनिक ओळख असतात
-
[ ] Ethereum-वर ते नेहमी 0x या अक्षरांनी सुरू होतात
-
[ ] ज्या व्यक्तीकडे खाजगी की आहे तिलाच त्या पत्त्यावरचे पैसे वापरता येतात
-
[ ] वरील सर्व